A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

कोरोनामुळे स्पेनमध्ये एका रात्रीत ७०० नागरिकांचा मृत्यू

news

माद्रिद (वृत्तसंस्था) : चीननंतर आता स्पेनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने कहर केला आहे. स्पेनमध्ये एका रात्रीत ७०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे ३,४३४ नागरिकांचा बळी गेला आहे, तर चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत ३,२८१ नागरिकांचा बळी घेतला आहे.

स्पेनच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ७३८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमधील मृतांचा आकडा ३,४३४ झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ४७,६१० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्पेनच्या राजधानीमध्ये आतापर्यंत १,५३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्पेनमध्ये ५,४०० आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

(PRAHAAR)

1485 Days ago