A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

गुरुनानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त पंजाब विधानसभेचं आज विशेष अधिवेशन

News

गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त पंजाब विधानसभेचं आज विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग या विशेष सत्रात सहभागी होतील, असं विधानसभेचे अध्यक्ष राणा के पी सिंग यांनी सांगितलं.

या ऐतिहासिक दिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात इतर महत्त्वाच्या आणि खास व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. गुरुनानक देवजी यांच्या तत्वज्ञानाविषयी उपराष्ट्रपती आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती सभागृहाला संबोधित करतील.

हे विशेष अधिवेशन सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालेल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी उपराष्ट्रपती असणार आहेत. (AIR NEWS)

1625 Days ago