A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

चीनचे नीच कृत्य : दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर शस्त्र पुरवठा

News

रंगून (वृत्तसंस्था) : भारत आणि जपानला युद्धाची धमकी देणा-या चीनविरोधात आता म्यानमारनेही आपला राग काढला आहे. म्यानमारच्या लष्कर प्रमुखांनी चीनला इशारा देत म्हटले आहे, की चीनने येथील दहशतवादी गटांना शस्त्र पुरवठा करू नये. यासंदर्भात लष्कर प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहकार्याची मागणी केली आहे. दक्षिण पूर्व आशियात, म्यानमार हा चीनचा सर्वात जवळील शेजारी असल्याचे मानले जाते.


रशियातील सरकारी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्यानमार लष्कर प्रमुख जनरल मिन आंग ल्हाइंग यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशातील सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांमागे मोठ्या शक्तीचा हात आहे. म्हणून त्यांनी आता आंतरराष्ट्रीय सहकायार्ची मागणी केली आहे. लष्कर प्रमुखांच्या, मोठ्या शक्ती म्हणण्याला चीनशी जोडून बघितले जात आहे.


म्यानमारचे सैन्य प्रवक्ता ब्रिगेडिअर जनरल जॉ मिन टुन यांनी यावेळी, म्यानमारच्या शस्त्र दलाच्या कमांडर-इन-चीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर सविस्तर चर्चा केली. प्रवक्त्याने म्हटले आहे, सेना प्रमुखांनी अराकान आर्मी (एए) आणि अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीचा (एआरएसए) उल्लेख केला. या दोन्हीही संघटना चीनला लागून असलेल्या रखाईन प्रांतात सक्रिय आहेत.

(PRAHAAR)

1386 Days ago