A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

जम्मू आणि काश्मीरमध्ये चकमकीत ४ दहशतवादी ठार

news

जम्मू आणि काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात मालवा इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं. लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी युसुफ कांतरू याचाही यात समावेश आहे. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याचं कळल्यानंतर सुरक्षा दलांनी काल सकाळपासून तिथे संयुक्त शोध मोहीम राबवली होती; या ठिकाणी अजूनही काही दहशतवादी असण्याची शक्यता असून ही मोहीम अजूनही सुरू आहे. (AIR NEWS)

728 Days ago