A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार

news

सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं २४ तास चालू ठेवण्याची परवानगी देत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोना उपया योजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

संचारबंदीमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे, त्यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसंच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावं म्हणून हा निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

दोन ग्राहकांमधलं अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छताया बाबत शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात, असंही मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धी कार्यालयानं दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (AIR NEWS)

1484 Days ago