भुकंपग्रस्त टर्कीतील दक्षिणेकडील भाग आणि सिरीयाच्या वायव्येकडील भागातील मृतांची संख्या आता 21 हजारापेक्षा जास्त झाली आहे. टर्कीमध्ये आतापर्यंत किमान 16 हजार 546 नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती राष्ट्रपती रिसेप तयीप एरडोगन यांनी दिली.
सिरीयामध्ये या भुकंपामुळे 3192 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचं सिरीयाच्या स्थनिक प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. ठिगाऱ्याखाली अडकलेल्याना मदत आणि बचावकार्य सुरु असून या भागांतील मृतांची संख्या वाढण्याची भीती मदत आणि बचाव पथकांनी व्यक्त केली आहे.
भुकंपग्रस्त भागातून 28 हजार नागरिकांना आतापर्यंत वाचवण्यात आल्याचं टर्कीच्या आपत्ती निवारण संस्थेनं सांगितलं. संयुक्त राष्ट्राची पहिली मदत तुकडी टर्की इथून बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य सीरियात पोहोचली आहे. भुकंपाची तीव्रता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन तयारी करणं अशक्य असल्याची खंत टर्कीचे राष्ट्रपती एरडोगन यांनी व्यक्त केली आहे. (AIR NEWS)