हवामान विभागानं काल मान्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल. या अंदाजात 4 टक्क्यांपर्यंत कमी जास्त होऊ शकतं. दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के ते 104 टक्के पाऊस सामान्य समजला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या म्हणजे जून महिन्यात मात्र महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात पाऊसमान कमी राहील असं हा अंदाज सांगतो. तसंच जून महिन्यात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. (AIR NEWS)