A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

देशातल्या एक लाख ई संजीवनी केंद्रांवर दूरध्वनी रुग्ण चिकित्सा सेवेला आजपासून आरंभ

News

ई संजीवनी दूरध्वनी रुग्ण चिकित्सा सेवा देशातल्या एक लाख ई संजीवनी केंद्रांवर आजपासून सुरु होत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या चौथ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून ही सेवा सुरु करण्यात येत आहे. देशातल्या प्रसिद्ध आणि चांगल्या डॉक्टरांचा सल्ला दूरध्वनीवरून मिळवणं आता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आलं आहे, असं ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. आयुष्मान भारतअंतर्गत अशा आरोग्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून सरकार प्राथमिक आरोग्य सेवा क्षेत्र भक्कम करत आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 17 हजारांहून अधिक आरोग्य केंद्रं कार्यान्वित झाली आहेत, असंही मांडवीय म्हटलं आहे. (AIR NEWS)

732 Days ago