A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

नालासोपा-यात टेम्पोत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

News

नालासोपारा (प्रतिनिधी) : नालासोपारा पूर्व, चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंधी येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी या प्रकार उघड झाला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले.


टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर हे आल्यानंतर टेम्पोतील गोणीत मृतदेह असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ती गोणी उघडून पाहिली त्यावेळी त्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. टेम्पोत मृतदेह नेमका कुठून आला आणि मृत महिला कोण आहे? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्या महिलेची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. महिलेची हत्या कोणी केली आणि का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

(PRAHAAR)

1387 Days ago