निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातल्या चार दोषींना येत्या २० मार्चला सकाळी साडेपाच वाजता फाशी द्यायचा निर्णय दिल्लीतल्या न्यायालयाने आज दिला.
याप्रकरणातली सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण झाली असल्याने आरोपींच्या फाशीची तारीख निश्चित केल्याचे दिल्ली राज्य सरकारने, अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले. (AIR NEWS)