A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आजपासून दोन दिवस मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर

News

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आजपासून दोन दिवस मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज इंदोर विमानतळावर त्यांचं स्वागत करणार आहेत. पंतप्रधान प्रचंड हे आज उज्जैन इथल्या श्री महाकाल मंदिरात पूजा करणार असून, त्यानंतर इंदोर इथल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देणार आहेत. तसच गेली सलग सहा वर्ष देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून केंद्र शासनाचा प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या इंदोर शहरात रावण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाची देखील ते माहिती घेणार आहेत. (AIR NEWS)

322 Days ago