A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोनाचा संसर्ग

News

कराची (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस महामारीचा विळखा दिवसागणिक आधिक घट्ट होत चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता नेत्यांनाही कोरोना व्हायरसनं ग्रासलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याआधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासीही कोरोनाबाधित झालेत.


शनिवारी माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यांचा मुलगा कासिम गिलानी यांनी ट्विट करत ही माहिती आहे. ६७ वर्षीय गिलानी भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणात एनएबीच्या सुनावणीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. गिलानीयांच्याआधी मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन)चे प्रमुख शहबाज शरीफ यांनाही एनएबीकडे उपस्थित राहिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला होता.


कोरोना व्हायरसच्या विळख्यात येणारे यूसुफ रजा गिलानी पाकिस्तानमधील पहिलेच नेते नाहीत. याआधी माजी पंतप्रधान शहिद अब्बासी, रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद, केंद्रीय राज्यमंत्री शहरआर आफ्रिदी, आमिर डोगर, खासदार नावेद अली आणि शरजील मेमन यासारख्या नेत्यांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यानंतर या नेत्यांनी स्वत:ला आयसोलेशन केलं आहे.

(PRAHAAR)

1405 Days ago