A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

पानसरे हत्या प्रकरणी शरद कळसकरला २४ जूनपर्यंत कोठडी

News

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील नववा संशयित आरोपी शरद कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचे समोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गेल्या सात दिवसांमध्ये कळसकर याचेकडून महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे त्याला आणखी सात दिवसांची कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी तिरूपती काकडे व विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी केली होती.

कळसकरचा पानसरे हत्येमध्ये महत्वाचा सहभाग आहे. मोबाईल व डायरीचा शोध घ्यायचा आहे. हा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने या वस्तू फेकून दिल्या. महाराष्ट्राच्या बाहेरील एका मोठ्या शहरात तपासासाठी त्याला घेऊन जायचे आहे. पिस्तूल बनवून तो कोल्हापुरात घेऊन आला होता. पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. पिस्तुल चालविण्याचे त्याने इतर साथीदारांसोबत बेळगावमध्ये प्रशिक्षण घेतले. कोल्हापुरातील आणखी एका साथीराचा सहभाग आहे. त्याचे वण॔न तो सांगतो; परंतू नाव सांगत नाही, असे तपास अधिका-यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अजून धक्कादायत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

(PRAHAAR)

1766 Days ago