प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नेपाळचे प्रधानमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याशी उभय देशांमधील सहकाऱ्याच्या विविध क्षेत्रांवर चर्चा करतील. नेपाळच्या प्रधानमंत्रीांचं काल भारताच्या ४ दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर नवी दिल्लीत आगमन झालं. विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी त्यांचं स्वागत केलं. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आलं आहे. (AIR NEWS)