A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

news

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये २२ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. गांधीनगर इथं जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवनिर्मिती परिषदेचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसंच दाहोद इथं आदिजाती महासंमेलनालाही ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगर इथं जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर टेड्रॉस घेब्रेयेसस यांच्याशी चर्चा केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राच्या पायाभरणीप्रसंगी या दोघांची भेट झाली. आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्याबद्दल त्यांच्यात चर्चा झाली. (AIR NEWS)

730 Days ago