A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांचा सामना धरमशाला इथे रंगणार

News

भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला ईथं खेळवला जाणार आहे. हासामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.

आकाशवाणीवरून या सामन्याचे धावत वर्णन इंग्रजी आणि हिंदीतून प्रसारित केले जाणार आहे. हे वर्णन एफ एम रेनबो वाहिनीवरूनही दुपारी एक वाजल्यापासून ऐकता येणार आहे. या मालिकेतला दूसरा एकदिवसीय सामना लखनऊ इथे १५ तारखेला तर तिसरा व शेवटचा सामना कोलकाता इथे या महिन्याच्या १८ तारखेला होणार आहे. (AIR NEWS)

1499 Days ago