A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक समभाग विक्री योजनेची आज सुरुवात

news

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक समभाग विक्री योजनेची सुरुवात आज करण्यात येणार आहे.

संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आजपासून तर सर्वसामान्यांसाठी या महिन्याच्या ४ ते ९ तारखेपर्यंत हे समभाग विक्रीसाठी उपलब्ध असतील.

LIC च्या IPO ची १७ मे रोजी शेअर बाजारात नोंदणी होईल.

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी,LIC नं त्यासाठी प्रति समभाग ९०२ ते ९४९ रुपये किंमत निश्चित केली आहे.

गुंतवणूकदार किमान १५ सम भागांसाठी आणि त्यानंतर १५ समभागांच्या पटीत मागणी नोंदवू शकतात.

LIC नं किरकोळ आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी ४५ रुपये प्रति समभाग आणि पॉलिसी धारकांसाठी ६० रुपये प्रति समभाग सवलत देऊ केली आहे.

एलआईसीचे २२ कोटी १३ लाख समभाग बाजारात आणले जाणार आहेत; या समभागांद्वारे LIC आपली साडे तीन टक्के भागीदारी विकत आहे. (AIR NEWS)

715 Days ago