A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मराठवाड्यातल्या २०५ ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द

News

मराठवाड्यातल्या २०५ ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथले सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी काल ही माहिती दिली. ते छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते.

राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं राज्यातल्या अकार्यक्षम ग्रंथालयांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र या ग्रंथालयांनी खुलासे सादर न केल्यानं ग्रंथालय संचालनालयानं ही कारवाई केली आहे. या ग्रंथालयांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या २०, जालना २९, नांदेड आणि बीड प्रत्येकी ३८, धाराशीव १९, परभणी १६, लातूर ३० तर हिंगोली जिल्ह्यातल्या १५ ग्रंथालयांचा समावेश आहे. जिल्हा ग्रंथालयांना ६० टक्के वाढीव अनुदानाची रक्कम येत्या चार ते पाच दिवसात मिळणार असल्याचंही हुसे यांनी सांगितलं. (AIR NEWS)

388 Days ago