मुंबई महानगर पालिकेचा २०२०-२१ या वर्षासाठीचा सुमारे ३३ हजार ४४१ कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार कोटी रुपयांनी अर्थसंकल्प वाढला आहे. या अर्थसंकल्पात विद्यमान करात कोणतीही वाढ नाही आणि नवीन करही प्रस्तावित नाही. पालिकेच्या उत्पन्नावर ताण पडत असला तरी भांडवली खर्चात ३६ टक्के वाढ करण्यात आल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
नव्या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटी, रस्ते वाहतूक प्रचलन आणि पुलांच्या पुनरबांधणीसाठी २ हजार ६९९ कोटी रुपये, पाणी पुरवठ्यासाठी १ हजार ७२८ कोटी आरोग्यासाठी १ हजार ४९ कोटी रुपये, मलनिसारणासाठी ९१२ कोटी, माहिती तंत्रज्ञानावर १५७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (AIR NEWS)