A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदी लागू

News

सद्यपरिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी, मुंबई पोलिसांनी मुंबईत येत्या १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव, कुठल्याही व्यक्तींच्या कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका, ध्वनिक्षेपक आणि संगीत वादकांचा संच आणि कुठल्याही प्रकारच्या मिरवणूकीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विवाह आणि तत्संबंधित इतर सोहळे, अंत्ययात्रा, चित्रपट-नाट्यगृह, सहकारी संस्थांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, उद्योग-व्यापार विषयक व्यवहार, सरकारी कार्यक्रम यांना यातून वगळलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुंबईत कुर्ल्यातले बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नावाचा फलक तोडल्या प्रकरणी, शिवसेनेचे शाखाप्रमुख दिलीप मोरे आणि १९ आंदोलकांना, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही माहिती दिली आहे. (IMPUT FROM AIR )

663 Days ago