A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मुंबईतल्या हाफकिन संस्थेला कोवॅक्सीन लस निर्मितीची परवानगी

news

मुंबईतल्या हाफकिन संस्थेला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीनं कोवॅक्सीन लस तयार करायला केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं मान्यता दिली आहे. यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीनं केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता दिली असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी काल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय.

कोवॅक्सीन तयार करण्यासाठी १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावन, तसंच त्यादृष्टीनं हाफकिनमधे लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असं या पत्रात म्हटलं आहे.

आपली विनंती मान्य करून केंद्र शासनानं ही परवानगी दिल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकतं, असं सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करायलाही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं आहे. (AIR NEWS)

1098 Days ago