A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मुंबईसह सहा शहरांतील विमानांना कोलकात्यात बंदी

news

कोलकाता (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसगार्ची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ६ जुलैपासून सुमारे २ आठवडे कोलकाता विमानतळावरून दिल्ली व मुंबईसह देशातील सहा शहरांसाठी प्रवासी विमान उड्डाणे होणार नसल्याचे कोलकाता विमानतळाने सांगितले.
ज्या शहरांमध्ये कोविड-१९ संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आहेत, अशा दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, इंदूर व अहमदाबाद यांसारख्या शहरांसाठी ६ ते १९ जुलै या कालावधीत कुठल्याही विमान उड्डाणांचे नियोजन करू नये, अशी विनंती प. बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला ३० जून रोजी केली होती. कोरोना फैलावाशी संबंधित टाळेबंदीमुळे दोन महिने बंद राहिल्यानंतर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक २५ मेपासून सुरू झाली होती. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक मात्र भारतात अद्यापही स्थगित आहे.


कोलकात्याहून दिल्ली, पुणे, नागपूर, चेन्नई, इंदूर व अहमदाबाद या शहरांसाठी ६ जुलैपासून १९ जुलैपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत, यांपैकी जे आधी असेल तोवर विमानांचे उड्डाण होणार नाही, असे ट्विट कोलकाता विमानतळाने केले

(PRAHAAR)

1381 Days ago