A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार, जानेवारीत होणार चाचणी

news

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सुरु असलेली मेट्रोची कामे वेगाने होत असून, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणी जानेवारी महिन्यात सुरु होणार आहे. विशेषत: या दोन्ही मागार्साठी लागणारे मेट्रो रेल्वे कोच येत्या काही दिवसांत चारकोप डेपोत दाखल होणार असून, जानेवारी महिन्यातील मेट्रो रेल्वेच्या ट्रायलनंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो धावणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी मेट्रो २-अ आणि मेट्रो-७ च्या कामाबाबत प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. यावेळी राजीव यांनी कोरोना काळात आलेल्या अडचणीसह मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या कामाचा आढावा घेतला.

आर. ए. राजीव यांनी सांगितले की, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरु आहे. ११ डिसेंबर रोजी मेट्रो कोचचे ३ सेट मुंबईत दाखल होणार आहेत. चारकोपमध्ये हे मेट्रो कोच दाखल होतील. एप्रिलमध्ये १० ट्रेन येतील. ट्रायल सुरु करण्यासाठी काही वेळ लागतो. किमान एक महिना यासाठीच वेळ विचारात घेतला आहे.

१४ जानेवारीच्या आसपास आपण मेट्रोच्या ट्रायल सुरु करू. मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरु होतील, असा विश्वास आहे. दहा मेट्रो सुरु करतानाच दोन मेट्रोमध्ये अर्धा तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल. सर्व योजना पूर्ण झाल्या आहेत. कोरोनामुळे काही अडचणी आल्या. कामगार कमी झाले. मात्र आम्ही अडचणींवर मात केली.

(PRAHAAR)

1316 Days ago