A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

युक्रेन युद्धामुळे दरांमधे झालेल्या वाढीचा फटका विकसनशील देशांना बसण्याची शक्यता

News

युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्न आणि ऊर्जा दरांमधे मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीचा जोरदार फटका विकसनशील देशांना बसेल असा इशारा आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे. अशा देशांना अधिक अनुदान आणि मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात वित्त सहाय्याची गरज भासेल, असं आयएमएफच्या वित्तीय व्यवहार विभागाचे संचालक विटर ग्लासपर यांनी सांगितलं. जोखीम टाळण्यासाठी ऋण पारदर्शकता सुधारण्याकरता तसंच कर्जव्यवस्थापन धोरणं मजबूत करण्याकरता या देशांनी तातडीनं सुधारणा हाती घेतल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.

कमी उत्पन्न असलेल्या देशांपैकी सुमारे ६० टक्के देश आधीच कर्जाच्या दबावाखाली आहेत. आघाडीच्या अर्थव्यवस्थांमधे व्याजदरात होत असलेली वाढ या देशांसाठीचं कर्ज आणखी महाग करणारी ठरेल, असं आयएमएफच्या धोरणप्रमुख सेयला पझरबासीओग्लू यांनी सांगितलं. (AIR NEWS)

737 Days ago