A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

योगी आदित्यनाथ सलग तिस-यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री

news

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिस-यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने केलेल्या ;मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मते सहा टक्क्यांनी वाढली आहेत.

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणा-या राज्यांचे आहेत. गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मतं मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ टक्के मतं मिळाले असून ते दुस-या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ मतांसोबत तिस-या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसहित सातव्या क्रमांकावर आहेत.

नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान
दुसरीकडे सर्वेक्षणात नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान ठरले आहेत. ४४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं मत नोंदवलं आहे. दुस-या क्रमांकावर अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश असून त्यांना १४ टक्के मतं मिळाली आहेत. तिस-या क्रमांकावर १२ टक्क्यांसहित इंदिरा गांधी आहेत. जवाहरलाल नेहरु आणि मनमोहन सिंग यांना प्रत्येकी पाच टक्के मतं मिळाली आहेत.

(PRAHAAR)

1350 Days ago