A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

राज्यात आज कोविड १९ च्या ७११ नव्या रुग्णांची नोंद

news

राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन हजार आठशेच्या जवळ गेली आहे. राज्यात आज ७११ नव्या रुग्णांची नोंद झाली. ४४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ३ हजार ७९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. (AIR NEWS)

380 Days ago