A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

राज्यात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २ हजारावर

news

राज्यात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २ हजारावर आली असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक १ दशांश टक्के झालं आहे.

राज्यात काल २३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. ४५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ७१ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २१ हजार ९६५ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ७५९ रुग्ण दगावले. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात २ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (AIRNEWS)

763 Days ago