राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओणम सणाच्या देशवासियांना शुभेच्या दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टांप्रती आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असून हा सण परस्परांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करतो, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण राजा महाबली यांच्या आठवणींना उजाळा देणारा असून प्रामाणिकपणा, दया आणि बलिदानाचं महत्व अधोरेखित करणारा आहे, असा संदेश देत उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम हा सण निसर्गदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देणारा असून, या सणाच्या माध्यमातून समाजात सद्भावना पसरेल, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून केरळी आणि मल्याळी नागरिकांना शुभेच्या दिल्या आहेत. (AIR NEWS)