रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू झाली. शुक्रवारी या बैठकीतले निर्णय जाहीर केले जातील. मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेनं १ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी व्याजदर वाढवले आहेत. सध्या रेपो दर ५ पूर्णांक ४ दशांश टक्के आहे. (AIR NEWS)