रूग्णालयात आग लागण्याच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारनं नवे निर्देश जारी केले आहेत. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रुग्णालयांना हे निर्देश लागू असणर आहेत. या निर्देशांनुसार अतिदक्षता विभागात डॉक्टर आणि परिचारिका कायम हजर असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या रुग्णांना स्वत:हून उठणं किंवा चालणं शक्य नाही, अशा रुग्णांना गरज पडल्यास इतरत्र नेण्यासाठी रूग्णालयाच्या यंत्रणेनं व्यवस्था करणं गरजेचं असून डॉक्टर आणि इतर कर्मचारी कायम उपलब्ध असणं, सीसीटीव्हीचं चित्रण सतत तपासलं जाणं आणि आपत्कालीन परिस्थतीत काम करण्यासाठी प्रशिक्षण देणं बंधनकारक आहे. अग्निसुरक्षेचं ऑडीट, अग्निरोधक उपकरणांची निगराणी, धूर शोधक यंत्रणा आणि पाणी फवारणी यंत्रणा या सर्वांचा नव्या निर्देशात अंतर्भाव करण्यात आला आहे. (AIRNEWS)