A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नवे लष्कर प्रमुख म्हणून निवड

News

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नवे लष्कर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. ते देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असतील.

लष्कर प्रमुख मनोज नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत, त्यानंतर १ मे रोजी पांडे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि लष्करातल्या इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असलेल्या पांडे यांनी डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समधून लष्करी सेवेला सुरुवात केली. त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह विविध पदकांनी गौरवण्यात आलं आहे. (AIR NEWS)

730 Days ago