पालघर/वसई (प्रतिनिधी) : वसई विरारमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. पहिला रूग्ण ज्या परिसरात आढळला त्याच परिसरात दुसरा रुग्णही आढळला. दुसरा रुग्ण हा दुबईवरून पाच दिवसांपूर्वी आला होता. त्याला लक्षणे जाणवू लागल्याने तो खासगी रुग्णवाहिकेने कस्तुरबा येथे तपासणीसाठी गेला होता. चाचणी अहवालात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता वसई-विरारमध्ये रुग्णांची संख्या दोनवर पोहचली आहे. पहिला रुग्ण सिडनीमधून आला होता. त्याच्या कुटुंबातील इतरांच्या चाचण्या झाल्या असून त्यात कोणीही बाधित आढळला नाही.
कोरोनाच्या रुग्णाचे नातेवाईकसुद्धा कस्तुरबाला दाखल झाले असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत. तसेच तो इतक्या दिवसात कुणाच्या संपर्कात आला याचा शोध सुरू असून ज्या रुग्णवाहिकेने गेला त्याच्या चालकाची तपासणीसुद्धा सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
(PRAHAAR)