A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

विलिनीकरणानंतर युनियन बँक देशातील ५ व्या क्रमांकाची मोठी बँक

news

मुंबई (प्रतिनिधी) : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेच्या आगामी विलिनीकरणानंतर ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनेल. हा करार झाल्यानंतर नव्याने तयार झालेली बँक म्हणजे ७५,००० कर्मचारी, ९६०० पेक्षा अधिक शाखा आणि १३,५०० पेक्षा जास्त एटीएम असलेले देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क असेल.

या विलिनीकरणामागे देशातील एक मोठी आणि कार्यक्षम बँक तयार करून बँकिंग क्षेत्राला जोखीम व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे. युनियन बँक आॅफ इंडियाचे महाव्यवस्थापक वेंकटेश मुचल यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच ग्राहकांना अधिक चांगली उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने या तीन बँकांची एकत्रिकरणासाठी निवड केली .

(PRAHAAR)

1482 Days ago