इजिप्तच्या कैरो इथं सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रूद्रांश पाटील या भारताच्या युवा नेमबाजानं सुवर्ण पदकाची कमाई केली. १९ वर्षीय रूद्रांशनं जर्मनीच्या मॅक्सिमिलान उल्ब्रिच याचा अंतिम फेरीत १६- ८ असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं रूद्रांशचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. काल त्यानं नर्मदा राजूच्या साथीत मिश्र दुहेरीतलं याच प्रकारातलं सुवर्णपदक पटकावलं होतं. आजच्या सुवर्णपदकामुळे भारताची या स्पर्धेतली पदक संख्या चार झाली आहे. (AIR NEWS)