A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

news

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या आणि आता १ ते १५ जुलैदरम्यान नियोजित असलेल्या सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. देशातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अद्याप कमी झालेले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सीबीएसईप्रमाणेच आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरून गुरुवारी सर्वोच्च न्यालायलात सुनावणी सुरू होती. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशा या राज्यांनी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेण्याबाबत शपथपत्राच्या माध्यमातून असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या १ ते १५ जुलैदरम्यान घेण्या येणा-या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र बारावीची परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल.

सीबीएसईप्रमाणेच आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यास आयसीएसईने असहमती दर्शवली आहे, अशी माहिती तुषार मेहता यांनी न्यायालयात दिली.

(PRAHAAR)

1393 Days ago