A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

सोनू सूद आता उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार

news

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सोनू सूद कोरोना काळात आपल्या सामाजिक कामांमुळे चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. लॉकडाऊनमध्ये फसलेल्या मजुरांसाठी मसिहा ठरलेल्या सोनू सूदने अनेक मजुरांना रोजगार देण्याचे देखील काम केले आहे. एवढेच नाही तर सोनूने गरीबांना रोजगार देण्याचे काम तर केलेच आणि मुलांच्या शिक्षणासाठी सामग्री देण्याचे काम सुरु केले आहे. आता सोनूने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनू सूद आता मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार आहे. कारण त्या मुलांच्या शिक्षणात काही कमी पडू नये. सोनू सूदने आपल्या आईच्या नावे ही स्कॉलरशिप सुरु केली आहे. सोनूने एक ट्विट करत म्हटले आहे की, ‘आपले भविष्य आपली ताकत आणि मेहनतच सिद्ध करणार आहे. आपण कुठुन आलो, आपली आर्थिक स्थिती कशी आहे, याचा याच्याशी काही संबंध नाही. एक प्रयत्न आता मी करत आहे. शाळेनंतरच्या शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप. ज्यामुळं तुम्ही आपले उच्च शिक्षण पूर्ण करु शकाल, यासाठी स्कॉलरशिपस् अ‍ॅट सोनुसूद डॉट इन यावर मेल करा, असे सोनू सूदने म्हटले आहे.

त्याने एक आणखी ट्वीट करत स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘हिंदुस्तान शिकेल तेव्हाच, जेव्हा शिक्षण चांगले मिळेल, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप लॉन्च करत आहोत. मला विश्वास आहे की आर्थिक अडचणींमुळे आपले ध्येय गाठण्यास अडचणी येऊ नयेत, आपली एंट्री वर पाठवा, मी आपल्यापर्यंत पोहोचेल, असे सोनूने म्हटले आहे.

(PRAHAAR)

1314 Days ago