A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

‘कोविड-१९’वर खर्चाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय अनभिज्ञ

News

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड-१९वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही?, असा धक्कादायक आरोप प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत गलगली यांनी केंद्र सरकारकडे कोविड-१९ वर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रोखण्यासाठी केलेल्या खर्चाची माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-१९च्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी होणा-या खर्चाशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्यास नकार दर्शविला आहे. त्यांच्याकडे कोणतीही विशिष्ट माहिती नाही, असे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे.

गलगली यांनी कोविड-१९साठी विकत घेतलेली उपकरणे व साहित्य यावर केलेला एकूण खर्चाची माहिती मागितली होती. 22 दिवसानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने गलगली यांना पाठविलेल्या आपल्या उत्तरात असे म्हटले आहे, की सीपीआयओ आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, एचएलएल लाइफकेयर लिमिटेडशी संबंधित विषयांवर काम करतो. तसेच केंद्रीय लोक माहिती अधिका-यांना अशी माहिती पुरविणे आवश्यक नाही, ज्यामध्ये हस्तक्षेप किंवा गृहित धरणे आवश्यक आहे. माहितीचे स्पष्टीकरण देणे किंवा अर्जदाराने उपस्थित केलेल्या समस्येचे निराकरण करणे किंवा काल्पनिक प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक नाही. मागविलेली माहिती आरटीआय अधिनियम २००५च्या कलम २ (एफ)नुसार परिभाषित केलेल्या माहितीच्या परिभाषेत येत नाही. सीपीआयओला काही विशिष्ट माहिती पुरविण्यास उपलब्ध नाही, असे विभागाने पुढे उत्तरात असे सांगितले.

आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अव्यवसायिक दृष्टिकोन व त्यानंतर दिलेल्या उत्तरावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना अनिल गलगली म्हणाले की, जर ही बाब असेल तर नकार देण्यास 22 दिवस का लागले. ही माहिती आरटीआयद्वारेच दिले जाऊ नये, तर सर्व वित्तीय तपशील वेबसाइटवर अपलोड केले जावेत. जेणेकरून कोणालाही खर्चाबाबत आरटीआय दाखल करण्याची गरज नाही, असे गलगली म्हणाले.

(PRAHAAR)

1419 Days ago